आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023″ व “शिवजयंती निमित्त” मा. पालकमंत्री रत्नागिरी व उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” व “शिवजयंती निमित्त” मा. पालकमंत्री रत्नागिरी व उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मा. श्री उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन स्पर्धेत 2000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा ५ की.मी.,१० किमी.,व २१ किमी अशी आयोजित करण्यात आलेली होती यावेळी पौष्टिक पदार्थांची माहिती देणारे सेल्फी पॉईंट व पोस्टर्स कृषी विभागामार्फत लावण्यात आलेले होते व महिला बचत गटांकडून पौष्टिक तृणधान्यांचे (नाचनीचे) मोदक, आंबोळी, लाडू इत्यादी पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आलेली होते या ठिकाणी पौष्टिक तृनधान्यांची माहिती घेण्यासाठी व पौष्टिक तृणधान्य पदार्थ खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला सदरच्या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब स्वतः उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री .देवेंदर सिंह, मुख्याधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी श्री. कीर्ती कुमार पुजार साहेब, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. सुनंदा कु-हाडे, अपर जिल्हाधिकारी श्रीम.शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी श्रीम.काळुशे , उपविभागीय अधिकारी श्री.विकास सुर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे,तहसिलदार रत्नागिरी श्री.शशिकांत जाधव, मुख्याधिकारी नगरपालिका रत्नागिरी श्री.तुषार बाबर व जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →