International Millet Year : पौष्टिक भरडधान्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना मोठा वाव…

आज भरडधान्ये ही ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असून, या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे.

आज भरडधान्ये ही ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असून, या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भरडधान्यापासून (Millet Crop) विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV, Akola) शास्त्रज्ञ डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले.म्हणून (Millet Year) घोषित केले आहे. त्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शहा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुक्यातील मौजे बारलिंगा येथे मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.ग्रामीण क्षेत्रात आज शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या भरडधान्यांचे विविध पदार्थ-नाचणीचे लाडू, वड्या, ज्वारी बाजरी भाकर, कुरडया, थालीपीठ, उपमा, नाचणी, ज्वारी, बाजरीची बिस्किटे, मुरमुरे, चटणी, ज्वारी पापड, नागलीचे पापड, भरडधान्यापासून अनेक पदार्थ बनवून त्यांची विक्री करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.मोतीलाल पाटील यांनी जुन्या काळात सर्वाधिक पसंती ज्वारी, बाजरी, नाचणीला होती. त्यामुळे आरोग्य सुद्धा चांगले राहत होते. पीएमएफई योजनाच्या वैशाली गाडे यांनीही मार्गदर्शन केले.आत्माचे तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार यांनी मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी कृषी सहायक अनुसया निलखन, कृषी पर्यवेक्षक रवी धनभर यांच्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या..

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →