महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा.ना.श्री. उदय सामंत वैद्यकीय सहायता कक्ष व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात पौष्टिक तृणधान्यांचे प्रचार प्रसिद्धी दालन.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत वैद्यकीय सहायता कक्ष व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी दामले विद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले होते . त्यावेळी कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे औचित साधून कृषी विभागाच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी श्री. एन.पी. भोये, मंडळ कृषी अधिकारी रत्नागिरी श्री. व्ही. एस. वाघमारे, कृषी पर्यवेक्षक श्री एल.जी. मांडवकर,कृषी सहाय्यक श्री गणेश जुवळे, आत्माच्या बीटीएम श्रीमती हर्षला पाटील हे उपस्थित होते यावेळी सुमारे 390 लोकांनी स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →