चिखलहोळ ता.विटा जि.सांगली

आज दिनांक 16/02/2023 रोजी मौजे चिखलहोळ तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखलहोळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील शिक्षिका सौ. प्रियांका चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी श्री सुर्यकांत माने मंडळ कृषी अधिकारी विटा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपले आरोग्य निरोगी ठेवायचे असल्यास रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य(ज्वारी, बाजरी,वरई,राळा, राजगिरा व नाचणी) चे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच मिलेट ऑफ द मंथ ज्वारी बाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती अमृता खंबाळकर कृषी सहायक यांनी पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून सांगितले. शेवटी शाळेतील शिक्षिका प्रियांका निकम यांनी विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा केली व सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास श्री बी.एस.गोसावी कृषी पर्यवेक्षक,सुरेखा हजारे सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →