नागनाथनगर ता.विटा जि. सांगली

आज दिनांक 16/02/2023 रोजी मौजे *नागनाथनगर * तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023 अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात श्री सुर्यकांत माने मंडळ कृषी अधिकारी विटा यांनी मानवी आरोग्य निरोगी ठेवायचे असल्यास रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य चे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच रक्तातील हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात तृणधान्यांचं प्रमाण वाढले पाहिजे व मिलेट ऑफ द मंथ ज्वारी बाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती अमृता खंबाळकर कृषी सहायक यांनी पौष्टिक तृणधान्य चे महत्व पटवून सांगितले.
सदर कार्यक्रमास नागनाथ नगर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास श्री बी.एस.गोसावी कृषी पर्यवेक्षक,सुरेखा हजारे सहाय्यक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →