जिल्हाधिकारी रंगले हुरडा पार्टीत……

आत्मा जळगाव यांच्या सहकार्याने नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदा यांनी राबवलेल्या हुरडा पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्रची पाहणी करून घेतला हुरडा खाण्याचा आस्वाद….

जळगाव : जळगाव जिल्ह्याची ओळख केळी कापूस व भरीताची वांगी पिकवणारा जिल्हा म्हणून राज्यभर आहे. परंतु आता जिल्ह्यात हुरडा ज्वारी पिकवून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात एक नवीन पीक पद्धत सुरुवात केली आहे. जळगाव शहरापासून जवळच असलेल्या आसोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळ व भादली बू.येथील शेतकरी गटाने यावर्षी आत्मा योजनेच्या माध्यमातून राहुल आल्या हुरडा पीक प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर जाऊन आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमान मित्तल व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पंकज आशिया यांनी पाहणी करून हुरडा खाण्याचा आस्वाद या ठिकाणी घेतला.
यावेळी जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हुरडा लागवड करून शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जेदार पद्धतीने हुरडा उपलब्ध करून देत असल्याने शेतकरी गटाला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करत असताना आपल्या पारंपरिक पीक पद्धती सोबतच ऋण धान्याची नाविन्यपूर्ण पिकांची लागवड करून शहरात उपलब्ध असलेल्या बाजारपेठेची संधीचं सोनं करण्याचे आव्हान देखील जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी पौष्टिकरणधान्य वर्ष 2023 मधील फेब्रुवारी हा महिना ज्वारी पिकासाठी समर्पित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ज्वारी खा….निरोगी रहा…. असा संदेश यावेळी उपस्थित त्यांच्या माध्यमातून समस्त शेतकऱ्यांना दिला.
यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थेट शेतमाल विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात रब्बी हंगामात उपलब्ध होणाऱ्या उच्च प्रतीच्या रब्बी ज्वारी (दादर) शहरी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास निश्चितचपणे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वैभव शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री.शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी श्री. एम. जी.जंगले, श्री.एम. के. वाल्हे, कृषि अधिकारी श्री.धीरज बढे,कृषि पर्यवेक्षक श्री. डी.डी.सोनवणे, श्री.डी.बी पाटील, नवनिर्मिती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी, भादली बु.सरपंच मिलिंद चौधरी, शरद नारखेडे (ग्रा.प. सदस्य असोदा) परेश लोखंडे, संजय पाटील, रामकृष्ण चौधरी, संजय ढाके, जितेंद्र भोळे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →