आनंदमळा नैसर्गिक शेती केंद्र व कृषी पर्यटन, दारुंब्रे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम

आज दिनांक 07 फेब्रुवारी 2023 रोजी आनंदमळा नैसर्गिक शेती केंद्र व कृषी पर्यटन, दारुंब्रे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्यांचे दैनंदिन आहारातील महत्व याविषयावर जि. प. शाळेतील शिक्षिका संगिता माढे यांनी मार्गदर्शन केले. तसेच फडतरे सरांनी पौष्टिक तृणधान्यांना प्रक्रिया उद्योगांमध्ये असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी महिलांसाठी पौष्टिक तृणधान्यापासून पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांना प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मा. उपविभागीय कृषि अधिकारी श्री. एस. जी. नर्हे , मा. तालुका कृषी अधिकारी, मावळ श्री. डी. बी. पडवळ , ज्वारी विशेषज्ञ फडतरे सर , मा. मंडळ कृषी अधिकारी काले कॉलनी श्री. डी. एन. शेटे , मा. कृषी पर्यवेक्षक काले कॉलनी 2 श्रीम. एस. एस. कानडे , मा. कृषी पर्यवेक्षक काले कॉलनी 1 शिंदे सर, कृषी सहाय्यक श्री.डी. एम. गावडे , श्री.एस. डब्ल्यू. गायकवाड ,श्रीम.एम. बी. घोडके, श्रीम. एस. वाय. गिरी ,श्रीम.ए. एम. खंडागळे, श्रीम.एन.बी. तारडे, सरपंच उमेश आगळे व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →