पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये झरी गावात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन.

आज दि.9/02/2023 रोजी ग्रामपंचायत झाई – बोरीगाव येथे ग्रामसभेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार व प्रसिध्दी बाबत माहिती दिली .

तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागातील महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या कृषि यांत्रिकीकरण , मधुमक्षिकापालन,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, वैयक्तिक शेततळे योजना आणि मग्रारोहयो अंतर्गत येणाऱ्या फळबाग लागवड ,जुनी भात शेती दुरुस्ती व मजगी इत्यादी. योजनांची माहिती देण्यात आली.

ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. ग्रामसभेला 128 ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री लक्ष्मण दत्तू भोये ,
कृषि सहाय्यक , सजा – झाई

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →