पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याचे लाडके आमदार श्री.विनोद निकोले साहेब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून रथास हिरवी झेंडी दाखवली.

मा.आमदार साहेब यांनी पौष्टीक तृणधान्य बाबत महत्व सांगून कृषी विभागाच्या या कार्याचे कौतुक केले.

आज गुरुवार दिनांक ९फेब्रुवारी रोजी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत चित्र रथाचे आगमन चिंचणी, वाणगाव, झाले.या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दुपारी १२.०० वाजता डहाणू तहसील कार्यालयासमोर आणण्यात आला.यावेळी तालुक्याचे तहसीलदार मा.अभिजित देशमुख साहेब, मा.आमदार श्री.विनोद नीकोले साहेब आणि डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. भरत रजपुत साहेब उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मा.आमदार श्री.निकोळे साहेब यांनी श्रीफळ वाढवून चित्र रथास हिरवा झेंडा दाखवून पुढील गावांना मार्गदर्शन करणेसाठी रवाना केला.तत्पूर्वी मा.आमदार यांनी सर्वांना संबोधित करताना पौष्टीक तृणधान्य रोजच्या आहारात वापर करणे आरोग्यदायी तसेच अतिशय गरजेचे आहे.हे पटवून दिले.यामुळे आपले आयुष्य वाढून निरोगी राहील. यानंतर या चित्र रथास डहाणू शहर परिसरात फिरविण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी मोटरसायकल रॅली वरून शहरात प्रचार प्रसिद्ध केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →