उन्हाळी नाचणीमुळे  शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती-मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार

अंतरराष्ट्रीय तृनधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री. राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कृषि अधिकारी पन्हाळा,आत्मा विभाग पन्हाळा व महाबीज कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या प्रक्षेत्र भेट कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.

पश्चिम भागातील एकूण ३८ शेतकऱ्यांनी २३ एकर क्षेत्रावर उन्हाळी नाचणी पिकाची लागवड व २ एकर क्षेत्रावर वरी पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामातील नाचणी लागवडीचा विचार करता नाचणी पिकाचे उत्पादन ८ ते १० क्विंटल प्रती एकर इतके आहे.

          खरीप हंगामाच्या उत्पादनाचा विचार करता तालुका कृषि विभाग पन्हाळा, आत्मा विभाग पन्हाळा, महाबीज, वनाचणी व तृणधान्य संशोधन प्रकल्प, शेंडा पार्ककोल्हापूर येथील शास्त्रज्ञ श्री. डॉ. योगेश बन  संयुक्त कामातून तसेच आत्मा अंतर्गत प्रात्याक्षिके व महाबीज कोल्हापूरच्या बिजोत्पादन योजनेतून पन्हाळा पश्चिम भागातील शेतकऱ्यांना उन्हाळी नाचणी उत्पादन घेण्याबाबत प्रात्यक्षिकांचा आधार घेऊन तसेच नाचणी व तृणधान्य संशोधन प्रकल्प, शेंडा पार्क कोल्हापूर येथील शास्त्रज्ञ श्री. डॉ. योगेश बन यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने उन्हाळी नाचणीची लागवड केली. त्यामुळे पन्हाळा पश्चिम भागातील उन्हाळी नाचणी उत्पादक शेतकरी यांनी एकरी १६ – २० क्विंटल इतके भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पन्हाळा भागात खरीप व उन्हाळी मिळून नाचणीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे उत्पादित झालेला माल विक्री होत नसलेने शेतकरी नाराज होते. ही बाब मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सदर बाबीची सविस्तर माहिती घेऊन नाचणी खरेदीसंदर्भात मार्केटिंग फेडरेशन कोल्हापूर यांना सुचना दिल्या त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील प्रती एकरी ८ क्विंटल नाचणी दर रु. ३५७८/- प्रती क्विंटल याप्रमाणे मार्केटिंग फेडरेशन ने खरेदी केली आहे त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली. त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील नाचणी उत्पादक शेतकरी श्री. सर्जेराव पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांची भेट घेऊन नाचणी उत्पादनाबाबत सविस्तर चर्चा केली व त्यांना चालू वर्षात आत्मा विभाग व महाबीज यांच्या माध्यमातून करण्यात आलेली उन्हाळी नाचणी लागवड प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यासाठी विनंती केली.

त्यांच्या विनंतीस मान देऊन मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांनी पाटपन्हाळा येथील वरी व नाचणी उत्पादक शेतकरी श्री. गणपती संभाजी पाटील यांच्या प्रक्षेत्रास भेट दिली तसेच काळजवडे येथील नाचणी उत्पादक शेतकरी श्री. प्रकाश पाटील यांच्या प्रक्षेत्रास भेट दिली. कृषी विभागाच्या  पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत लाभार्थी श्री. विजय पाटील पोहाळे यांच्या प्रक्रिया केंद्रास भेट दिली.

यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी नाचणी वर प्रक्रिया करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले तसेच कोल्हापूर जिल्हा  मार्केटिंग फेडरेशन च्या सहाय्याने पन्हाळा तालुक्यात खरेदी केंद्रास  सुरवात करण्याची ग्वाही दिली. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत वाढ करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्याने रेशीम लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेऊन लागवड करावी व आपली आर्थिक उन्नती साधावी असे सांगितले. महाबीज कोल्हापूर च्या माध्यमातून विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले.

          सदरच्या कार्यक्रमासाठी तालुका कृषि अधिकारी,पन्हाळा श्री. डी. एस शिंगे, जिल्हा व्यवस्थापक महाबीज कोल्हापूर श्री. नासीर इनामदार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पन्हाळा श्री. आर. एस चौगुले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. व्ही. ए. पाटील,कृषि क्षेत्र अधिकारी श्री. फुलसिंग आडे, कृषि सहाय्यक श्री. मधु कुंभार , , प्रगतीशील शेतकरी श्री. दिलीप चौगले हरपवडे, सर्जेराव पाटील, किसरूळ,प्रकाश पाटील, काळजवडे, मिलिंद पाटील, पिसात्री, व नाचणी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →