उन्हाळी नाचणीचे “पन्हाळा मॉडेल”

जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा पहिलाच प्रयोग राज्यात यशस्वी ठरला. पन्हाळा तालुक्यात आत्मा, महाबीज आणि राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प , शेंडा पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी हंगामात नाचणी बिजोत्पादन कार्यक्रमाची पूर्वतयारी केली. खरीपात उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांकडे जिथे पाण्याची सोय उपलब्ध आहे,अशा ठिकाणी नाचणीचे बिजोत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. आत्म्याच्या पीक प्रात्यक्षिक बाबीमधून शेतकर्‍यांना फुले, नाचणी या अधिक उत्पादनक्षम वाणाचे बियाणे, युरिया ब्रिकेट्स , एक तण नाशक , दोन बुरशी नाशके आणि एक कीटकनाशक अशा प्रात्यक्षिक निविष्ठा देण्यात आल्या. पहिल्या वर्षी केवळ 15 एकारांवर राबविलेल्या प्रयोगाच्या यशानंतर दुसर्‍या वर्षी पन्हाळा तालुक्यात 110 एकारांवर उन्हाळी नाचणीची यशस्वी लागवड झाली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →