वसई तालुक्यातील अर्नाळा सोसायटीत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन सभा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक सतृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम तसेच सहकार, पणन, व विविध कृषि विषयक योजनांची माहिती देनेकरिता आज दिनांक ०४.०३.२०२३ रोजी अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. विरार, ता.वसई, जि. पालघर येथे आयोजित कार्यक्रम करिता, अर्नाळा, आगाशी, टेंभी कोल्हापूर, परिसरातील शेतकरी बांधव, व वर्तक महाविद्यालय वसई येथील प्राचार्य, प्राध्यापक, व विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी कार्यालय वसई मार्फत बी. टी.एम. श्रीम. देशमुख मॅडम व कृषि सहाय्यक, श्री. एस. एस.चव्हाण उपस्थित होते. G-20 परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबतचे महत्त्व या विषयावर वर्तक महाविद्यालयातील प्राचार्य यांनी महत्त्व विषद करून उपस्थितांमध्ये जनजागृती केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →