आज दि. 22/2/2023 बुधवार रोजी मंडळ कृषी अधिकारी,ढेबेवाडी अधिनस्त मौजे शिद्रुकवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत तृणधान्य विशेष फेब्रुवारी समर्पित महिना-ज्वारी पिक हुरडा पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व याविषयी श्री.दौलत चव्हाण उपविभागीय कृषि अधिकारी कराड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी खमंग हुरड्याचा, निस्रगाच्या सानिध्यात आस्वाद घेतला .तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमास श्री दत्तात्रयखरात तंत्र अधिकारी कराड ,श्री सुनील ताकटे ,कृषि अधिकारी कराड ,श्री नेवसे कृषि पर्यवेक्षक ढेबेवाडी व इतर शेतकरीबांधव उपस्थित होते. कार्यक्रमांची सांगता श्री.अर्जुन पवार कृषि सहाय्यक यांनी आभार मानून झाली.