आज दि. १५/०२/२०२३ रोजी तालुकास्तरीय तृणधान्य कार्यशाळा पंचायत समिती सभागृह आर्वी येथे आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेस ताकृअ कु. एस. वायवळ, कृषि अधिकारी पंस श्रि. कोडवते, श्रि. घारड, कृषि विभाग कर्मचारी , शेतकरी, महिला गट उपस्थित होते. यावेळी सावंगी मेघे येथिल आयुर्वेदाचार्य डॉ. सावरकर मॅडम यांनी उपस्थितांना तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.