शिरसोली : राष्ट्रीय सेवा योजना आयोजित हिवाळी शिबिर अंतर्गत मणियार महाविद्यालय जळगाव पौष्टिक तृणधान्याचे आहारातील सांगितले महत्त्व…

शिरसोली येथे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित हिवाळी शिबिर अंतर्गत एस एस मणियार विधी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांना दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2023 विविध उपक्रम राबविले यात प्रामुख्याने दिनांक 3 रोजी कृषी विभागाकडून श्री नरेंद्र पाटील यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व श्री डी बी पाटील यांनी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी श्री भारत पाटील यांनी अपघात विमा योजना व पौष्टिक तृणधान्य खाण्याची शपथ दिली. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या त्यानंतर 20 विद्यार्थ्यांनि गावातील विविध भागात जाऊन एकूण चारशे घरी जात शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व पौष्टिक तृणधान्य संदर्भात प्रचार व प्रसिद्धी केली. विधी महाविद्यालयातीलच विद्यार्थिनी यांनी समाज प्रबोधन पर कीर्तन केले. या कामी एस एस मणियार लॉ कॉलेजचे प्राध्यापक श्री धुमाळ सर श्रीमती लोखंडे मॅडम तसेच भारी समाज माध्यमिक शाळेचे संचालक श्री निलेश भारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →