पौष्टिक तृणधान्यावर आधारित एकांकिका जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सादर

उस्मानाबाद जिल्हा कृषि विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक कला क्रीडा महोत्सवात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमात “मिलेट बॉय” हि एकांकिका सादर करण्यात आली. सदर कार्यक्रम नगर परिषद उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे घेण्यात आला. सदर एकांकिकेतून पौष्टिक तृणधान्य, आहारतज्ञ यांचे महत्व तसेच शासकीय योजनेमधून पौष्टिक तृणधान्य याबद्दल केले जाणारे प्रयत्न इ विनोदी तसेच वैचारिक पद्धतीने मांडण्यात आले होते.

सदर एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन हे जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे नोडल अधिकारी श्री. संदीप ढोणे यांनी केले होते. नेपथ्य श्री. सुहास गुंड (कृषि सहायक ), वेशभूषा श्री. राहुल जाधव(कृषि सहायक ) तर संगीत संयोजन निलेश खरात(लघुलेखक) व शुभम राऊत यांनी केले होते. या नाटिकेत संदीप ढोणे हे मध्यवर्ती भूमिकेत होते. तर इतर कलाकार म्हणून नितीन गायकवाड, पी. एस. चव्हाण, अजित बरडे इ कलाकारांनी सहभाग घेतला होता. सदर एकांकिकेसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. महेश तीर्थकर यांचे विशेष सहाय्य लाभले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →