पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा व प्रदर्शन, आहार तज्ञांचे व्याख्यान/कार्यशाळा – ता. सांगॊला दि.24/1/2023

दिनांक २४/०१/२०२३ रोजी बचत भवन,पंचायत समिती सांगोला येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत कृषि विभाग,उमेद अभियान व कृषि विज्ञान केंद्र मोहोळ यांचे संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व प्रदर्शन , आहारतज्ञाचे व्याख्यान/कार्यशाळा आयोजित करण्यात आले. सदर पाककला स्पर्धेस तालुक्यातील महिलांनी तसेच महिला बचतगट यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पौष्टिक तृणधान्याच्या वेगवेगळ्या पाककृती पाहावयास मिळाल्या. सदर कार्यक्रमास मा.सर्जेराव तळेकर उविकृअ पंढरपूर , तहसिलदार अभिजित पाटिल’, डाॕ.वाळकुंडे कार्यक्रम समन्वयक kvk मॊहोळ ,डाॕ दिनेश क्षिरसागर शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र मोहोळ व डाॕ नेहा साळुंखे पाटिल मॕडम यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
,डाॕ दिनेश क्षिरसागर शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र मोहोळ व डाॕ नेहा साळुंखे पाटिल मॕडम यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →