मौजे ठाकूरवाडी व चोची येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 उत्साहात साजरा.

कर्जत तालुक्यतील मौजे ठाकूरवाडी स्टेशन या दुर्गम भागातील शेतकरी व महिला बचत गट व मौजे चोची येथे मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड श्रीमती बाणखेले मॅडम, मा.उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली श्री बालाजी ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता.या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत कृषी प्रक्रिया प्रती पूर्ती सप्ताहाचे शुभारंभ करण्यात आला.श्री अशोक गायकवाड,मंडळ कृषि अधिकारी,कशेळे प्रास्ताविक केले, श्री मंगेश गलांडे, कृषी पर्यवेक्षक नेरळ यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताहाबाबत तसेच बचत गटातील महिलांसाठी विविध प्रक्रिया उद्योगांबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले .श्रीमती शितल शेवाळे तालुका कृषी अधिकारी कर्जत यांनी पौष्टीक तृणधान्य चे आहारातील महत्व विशद केले, कृषि विभागाच्या योजना, कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,बाबत श्री सुदर्शन वायसे, कृषी पर्यवेक्षक कर्जत यांनी माहीती दिली.श्री तुळशीराम कवठे, मा. उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बीड बुद्रुक यांनी उपस्तिथ शेतकरी तसेच बचत गटाच्या महिला यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.मान्यवर चा सत्कार काजू रोपे देऊन करण्यात आला.सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन श्री सचिन केणी कृषी पर्यवेक्षक कळंब यांनी केले, कार्यक्रमाचे नियोजन श्री दिनेशकुमार कोळी,मंडळ कृषि अधिकारी, कर्जत यांनी केले.श्रीमती श्रद्धा देवकर कृषी सहाय्यक पळसदरी ,श्री. दत्तू देवकाते कृषि सहाय्यक,श्री विजय गंगावणे कृषी सहाय्यक मानिवली यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

मौजे चोची तालुका कर्जत येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →