प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर यांच्यामार्फत पौष्टिक तृणधान्य वर्षाची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर येथे श्री एन वाय घरत साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तृणधान्याची शपथ घेण्यात आली, पोलादपूर तालुक्यात पंचायत समिती पोलादपूर पोलीस ठाणे पोलादपूर या ठिकाणी तृणधान्याचे महत्त्व सांगून नाचणी वरी ज्वारी बाजरी राळ इत्यादी तृणधान्याचाआहारात वापर करून शारीरिक मानसिक सुख उपभोगावी असे सुचित करून तृणधान्य बाबत शपथ घेण्यात आली तसेच ग्रामपंचायत चांभारगणी बुद्रुक,कोंडवी वाकण ,गोळेगणी, देवळे भोगाव खुर्द,बोरज,लोहारे साखर, तुर्भे बुद्रुक, कोतवाल खुर्द, कापडे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये व उच्च माध्यमिक माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये शेतकरी वर्गाला विद्यार्थ्यांना आहारातील तृणधान्याचे महत्त्व सांगून *तृणधान्य खाण्याबाबत शपथ घेण्यात आली व गावात तृणधान्याच्या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. तालुक्यातील या संपूर्ण कार्यक्रमात तृणधान्य खाण्यातील वापराबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली.तालुक्यातील हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मा श्री एन वाय घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी श्री सुरज पाटील साहेब श्री गजेंद्र धनीवले साहेब कृषी पर्यवेक्षक श्री मोरे साहेब, कदम साहेब, गुंड साहेब देशमुख साहेब, धायगुडे साहेब यांच्या प्रयत्नातून सर्व कृषी सहाय्यक वर्ग व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कपिल पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ची प्रचार प्रसिद्धी करून महिला बचत गटांना नाचणी, वरी ,राळ यापासून तयार करता येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →