बहिणाबाई महोत्सव आयोजित पद्मश्री मा. श्रीमती रहीबाई पोपेरे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 पार्श्वभूमीवर जनजागृती पर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्या दालनास भेट…

माननीय श्रीमती पद्मश्री रहीबाई पोपेरे बीज माता यांनी आज जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय जळगाव येथे भेट दिली तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्यामार्फत राबवित असलेले जनजागृती पर उपक्रमांची माहिती जाणून घेतली तृणधान्यावर वरील आधारित पोस्टर भित्तिपत्रकांचे विमचंद करण्यात आले बीजमाता यांचे स्वागत मिलिट बास्केट देऊन माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव श्री संभाजी ठाकूर यांनी केले तसेच प्रास्ताविक आभार प्रदर्शन माननीय कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांनी केले सदर प्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे माननीय जिल्हाधिकारी जळगाव श्री अमन मित्तल साहेब यांनी देखील बीजमाता यांचा मिलेटबुके देऊन स्वागत केले तसेच बीजमाता यांनी केलेले कार्य व त्यांचा अनुभव आपल्या कृषी विभागाशी कशा अनुषंगाने कामा येऊ शकतो याबाबत माहिती विशद करून योग्य त्या सूचना माननीय श्री संभाजी ठाकूर साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व माननीय कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांना दिल्या त्याप्रमाणे बीजमाता यांनी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तदनंतर बहिणाबाई महोत्सव येथील आयोजित पद्मश्री माननीय श्रीमती रहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला बहिणाबाई महोत्सव कृषी विभागाच्या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 पार्श्वभूमीवर जनजागृती पर कृषी विभागाच्या दालनास भेट दिली

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →