आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पंचतारांकित हॉटेल रॅडीसन ब्लू,नाशिक येथे मिलेट रेसिपी चे विशेष नियोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त श्री प्रसेन गवळी, चिफ शेफ, हॉटेल रॅॅडीसन ब्लू यांनी जि.अ.कृ.अ.कार्यालयास भेट दिली. त्यानुषंगाने त्यांना श्री.जयंत गायकवाड, तंत्र अधिकारी (विस्तार) यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली तसेच विविध पाककृती चे पुस्तक व माहिती पत्रक त्याप्रसंगी देण्यात आले. याच अनुषंगाने जानेवारी महिन्यात प्रत्येक रविवारी पंचतारांकित हॉटेल रॅॅडीसन ब्लू , नाशिक येथे “मिलेट रेसिपी” चे विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच येथे येणाऱ्या ग्राहकांना विविध मिलेट बाबत माहिती होण्यासाठी “मिलेट डिस्प्ले” करण्यात आलेला आहे.

मिलेट डिस्प्ले
मिलेट – अडई डोसा
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →