दापोली जि.रत्नागिरी येथे मकर संक्रांत हा सणाचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा.

मौजे करंजाळी व मौजे पावनळ ता.दापोली जि.रत्नागिरी येथे दि. 15/01/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, २०२३ च्या निमित्त मकर संक्रांत हा सणाचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पौष्टिक तृणधान्य यांचे प्रकार, नाचणी,वरी, राळा,राजगीरा, बाजारी,ज्वारी इ. आहारातील महत्व, नाचणी,वरी, राळा,राजगीरा यांचे क्षेत्रवाढी व नाचणीपासून तयार होणाऱ्या पदार्थ विषयी मार्गदर्शन केले यावेळी, कृषी सहाय्यक करंजाळी व्ही एस चकोर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या‌. व राजगीरा लाडू चे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →