दि.१३/०९/२०२३ अमळनेर येथे तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दि.१३/०९/२०२३ अमळनेर येथे तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सोनाली सोनवणे कृषी अधिकारी ,तालुका कृषी अधिकारी अमळनेर व श्री.मयुर कचरे मंडळ कृषी अधिकारी,अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनवणे मॅडम यांनी उपस्थितांना तृणधान्याचे आहारातील महत्व यावर मार्गदर्शन केले. कृषी सहायक लांडगे मॅडम यांनी PMFME योजने बद्दल मार्गदर्शन केले .अमळनेर तालुक्यातील महिलांनी विविध प्रकारच्या पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ या स्पर्धेकरीता आणले होते. स्पर्धेचे परिक्षण करणेकरीता सौ. कांचन शहा,परमित कॉलरा या उपस्थित होत्या. सदर स्पर्धेमध्ये खालीलप्रमाणे महिला विजेत्या झाल्या: 🥇प्रथम क्रमांक विमल डेरे 🥈द्वितीय क्रमांक:सौ हेमा पुरकर 🥉 तृतीय क्रमांक: सौ. राजश्री नेरकर . विजेत्या महिलांना मिलेट बास्केट व प्रमाणपत्र तसेच सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सौ.रंजना देशमुख अध्यक्ष वाणी समाज महिला मंडळ तसेच अमळनेर कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक दिपाली सोनवणे मॅडम यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →