मौजे शिरोली पु. ता.- हातकणंगले , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिमे कार्यक्रम संपन्न.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिमे कार्यक्रम शिरोली हायस्कुल , मौजे शिरोली पु., ता.- हातकणंगले , जिल्हा- कोल्हापूर येथे दिनांक – १४/८/२०२३ रोजी घेण्यात आला. मुख्याध्यापक श्री. स्वामी सर यांनी प्रास्तविक व स्वागत केले. सदर कार्यक्रमामध्ये तृणधान्यपासून बनवलेले विविध पदार्थ, शेतकरी नृत्यगीत, तृणधान्य प्रतिज्ञा, विविध कृषि योजना माहितीचा कार्यक्रम व प्रदर्शन संपन्न झाले . तसेच श्री. जयवंत जगताप कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांचे तृणधान्य आहारातील महत्व, पिकाचे तत्रज्ञान व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व चर्चासत्र झाले. उपस्थित शेतकऱ्यांना कृषि अधिकारी श्री धिरज तोरणे यांनी विविध योजनांची माहिती दिली, मंडळ कृषि अधिकारी श्री नंदकुमार मिसाळ व कृषी पर्यवेक्षक श्री. रमेश परीट यांनी पौष्टिक तुनधान्ये ज्वारी, बाजरी, राजगिरा, वरई, नाचणी, राळा इ तृणधान्यची माहिती दिली. कृषि सहायक श्री.उमेश सकटे व कृषि सहाय्यक प्रकाश पालकर यांनी सर्व विध्यार्थी व शिक्षक वृंद यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य बाबत शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे चेअरमन श्री सुरेश पाटील साहेब यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →