मौजे बामणोद तालुका यावल येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2023…

मौजे बामणोद तालुका यावल येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2023 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री गणेश बाविस्कर कृषी सहाय्यक बामणोद यांनी केली. पौष्टिक तृणधान्यचे महत्व कृषी पर्यवेक्षक श्री महेश आगीवाल यांनी सांगितले.
कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने (कु. रोशनी सोनवणे) स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत पौष्टिक तृणधान्यचे महत्त्व अतिशय चांगल्या प्रकारे विषद केले. त्यामुळे उपस्थितांनी तिचे खूपच कौतुक केले. कार्यक्रमास हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षक – सौ सुजाता कंकाळ, कृषी सहाय्यक – श्री महेंद्र पाटील, श्री हितेंद्र चौधरी, सौ द्रोपदी काठोके, सौ संगीता वाघ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →