मौजे तारदाळ,ता – हातकंनगले जि – कोल्हापूर, येथील सन्मती विद्यालय तारदाळ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिम कार्यक्रम उत्साहात संपन्न..

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहिमे अंतर्गत आज  मौजे तारदाळ मधील सन्मती विद्यालय तारदाळ येथे कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य श्री.तेरदाळे सर यांनी प्रास्तविक व स्वागत केले. मंडळ कृषी अधिकारी श्री.नंदकुमार मिसाळ यांनी पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, राजगिरा, वरई, नाचणी, राळा इत्यादीचे आहारातील महत्त्व व फायदे सांगितले. श्री. रमेश परीट कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टिक तृणधान्याच्या बियाणांची ओळख, लागवडीचे तंत्रज्ञान व त्यांचे महत्व घोष वाक्याच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना सांगितले, मा.तालुका कृषी अधिकारी श्री.अभिजित गडदे यांनी कृषी विभाग राबवित असणाऱ्या योजनांची माहिती दिली व सर्व विध्यार्थी व शिक्षक वृंद यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष ची शपथ दिली. कार्यक्रमाचे  आभार कृषी सहाय्यक श्री. सचिन आलमाने यांनी मानले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →