जामनेर : शेंगोळे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निम्मित तसेच प्रधान मंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना, खरीप हंगाम 2023 पूर्व तयारी बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निम्मित तसेच प्रधान मंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना, खरीप हंगाम 2023 पूर्व तयारी बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व उद्योजक बना असे आवाहन करत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी गट, शेतकरी उत्पदक कंपनी स्थापन करा असे आवाहन केले. खरीप हंगाम 2023 नियोजन बाबत शेतकरी यांनी जमीन पूर्वमशागत, बीज प्रक्रिया, सेंद्रिय निविष्ठा बांधावर तयार करण्याची पद्धती व त्याद्वारे कीड रोग नियंत्रण, खर्च कमी करण्याची पद्धत, आंतरमशागत, आंतरपीक पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व व बदलत्या जीवनशैली मुळे पौष्टिक तृणधान्यचा आहारात समावेश करावा असे आवाहन केले. स्मार्ट योजना, गट शेती बाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अशोक वाळके कृषी पर्यवेक्षक पी एस पाटील, एस ओ अहिरे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राकेश पाटील, कृषी सहायक संजय टेमकर गावचे सरपंच उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →