मा. ना. श्री.अब्दुल सत्तार साहेब, कृषि मंत्री, महोदय, यांनी केली पाहणी…


दिनांक 22.03.2023 रोजी मौजे कुऱ्हे खु – टाकरखेडा ता. अमळनेर जि.जळगाव येथेअवकाळी /वादळी पावसा मुळे रब्बी पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी मा. ना. श्री.अब्दुल सत्तार साहेब, कृषि मंत्री, महोदय, यांनी केली .यावेळी बाधित शेतकरी श्रीम. सुनीता गोरख कुंभार रा. कुऱ्हे खु. यांचे गट नं.107/2/2/ब, पिक मका क्षेत्र 1.75 हे. पैकी 33%च्या वरील बाधित क्षेत्र 0.60 हे.व श्री. कैलास शांताराम पाटील रा. टाकरखेडा गट नं.196 पिक मका क्षेत्र 1.50 पैकी बाधित क्षेत्र 0.60हे. ची प्रक्षेत्राची पाहणी उपस्थित बाधित शेतकरी यांचे समवेत केली. एकही बाधित शेतकरी वंचित राहू नये यासाठी वास्तुनिष्ठ पंचनामे 25.03.2023 पूर्वी करून अंतिम अहवाल संयुक्त स्वाक्षरीने सादर करणेबाबत महसूल,कृषि व ग्रामविकास प्रशासनाला सूचना दिल्या.यावेळी मा. श्री.मोहन वाघ साहेब,विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक,मा. श्री.संभाजी ठाकुर साहेब,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जळगाव,मा.श्री. दादाराव जाधवर,उपविभागीय कृषि अधिकारी, अमळनेर, मा. श्री. मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार,अमळनेर,मा.भरत वारे,तालुका कृषि अधिकारी अमळनेर, तालुक्यातील मंडळ अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी, कृषी पर्यवेक्षक कृषि सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पिक विमा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी, पत्रकार छायाचित्रकार व बाधित शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →