मौजा – वालूर ,तालुका- सेलू ,येथे 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती , प्रचार व प्रसिद्धी सभा

दिनांक 11-3-23 रोजी मौजा – वालूर ,तालुका- सेलू ,येथे 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती , प्रचार व प्रसिद्धी सभा घेण्यात आली.
संयुक्त राष्ट्रने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. ज्वारी, बाजरी ,नाचणी , राजगिरा यासारखे तृणधान्य ही आरोग्याला पोषक असतात. याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने वालूर येथे आज सभा घेण्यात आली सदर सभेमध्ये
तृण धान्याचे आपल्या शरीरातील महत्त्व, तसेच लहान मुलांपासून वृद्धापर्यंत तृणधान्य आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे सविस्तरपणे सांगण्यात आले तसेच विविध योजनेबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक संदीप शेळके यांनी मार्गदर्शन केले , यावेळी गावचे सरपंच संजय साडेगावकर उपसरपंच गणेश मुंडे , पंचायत समिती सदस्य पांडुरंग रोकडे व शेतकरी उपस्थित होते आभार प्रदर्शन वालूर येथील प्रगतिशील शेतकरी शैलेश तोष्णीवाल यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →