मौजे धामणी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन

दिनांक ०१/०३/२०२३रोजी मौजे धामणी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रमामधे प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली. तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहिती देण्यात आली.यावेळी नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड, बिस्कीट, नाचणीची वडी, चकली, इडली, नाचणी नुडल्स, नाचणी पुरणपोळी, नाचणी शिरा इ नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →