लांजा जि.रत्नागिरी येथे लांजे पंचक्रोशी विविध कार्यकारी संस्था लांजा व कृषि विभाग यांचेवतीने पौष्टिक तृणधान्य चे मानवी आरोग्याचे दृष्टीने महत्त्व याबाबत कार्यक्रमाचे आयोजन

24/02/2023 रोजी लांजा जि.रत्नागिरी येथे लांजे पंचक्रोशी विविध कार्यकारी संस्था लांजा संस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमामध्ये मा.सहसंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे डॉ. वैभव शिंदे सर यांनी कृषि आणि कृषि पूरक शेती पद्धती बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मा. उपविभागीय कृषि अधिकारी रत्नागिरी श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, पौष्टिक तृणधान्य चे मानवी आरोग्याचे दृष्टीने महत्त्व, कृषि विभागाच्या योजना या बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकाची ( नाचणी, वरी ) येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर लागवड करणे तसेच नाचणी पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु करणेसाठी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेणेबाबत आवाहन केले..या कार्यक्रमात जिल्हा कृषि कार्यामार्फत छपाई केलेली “नाचणी लागवड तंत्रज्ञान आणि नाचणी प्रक्रिया उत्पादने ” ही पुस्तिका उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते वितरीत केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →