दि. २३ ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कृषी मेळावा मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी तसेच प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने स्टॉल लावण्यात आला, यात पौष्टिक तृणधान्याचे जिवंत नमुने नागरिकांना दाखवण्यात आले तसेच याबद्दलचे महत्व लोकांनां सांगण्यात आले. या कृषिमहोत्वास स्वतः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांनीहि प्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला व लोकांनां पौष्टिक तृणधान्याचे महत्व सांगितले. कृषी विभागाचा स्टॉल ला मा. आमदार मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे तसेच आयोजक श्री आनंदराव भरोसे यांनी भेट देऊन पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जाणून घेतले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →