नस्तनपुर ता.नांदगाव येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमात आहारात बाजरी ज्वारीचा समावेश करणेबाबत मा.श्री.मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग यांचे आवाहन

नस्तनपुर येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम आहारात बाजरी ज्वारीचा समावेश करावा मा.विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांचे आवाहन तसेच उन्हाळी बाजरी प्रक्षेत्र भेट व शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

नस्तनपुर येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत बाजरी पीक प्रात्यक्षिकांची पाहणी व शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंदांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री मोहन वाघ यांनी शिक्षक वृंदांना व पालकांना विद्यार्थ्यांचे आहारात बाजरी ज्वारी या पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा. तसेच शालेय पोषण आहार (मिड डे मील ) मध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा असे आवाहन केले.कृषी विभागा मार्फत 625 एकर क्षेत्रावर धनशक्ती या सुधारित बाजरी वानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहेत. त्यामधून उत्पादन होणारी बाजरी ही लोह आणि फायबर युक्त असल्याने तिचा प्रचार प्रसार करण्याचे सूचना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. न्यायडोंगरी येथील श्री भाऊसाहेब मोतीराम काकळीज यांची शेतातील बाजरी पिकास भेट दिली त्यावेळी श्री सतीश शेळके श्री बत्तासे, ज्ञानेश्वर आहेर उद्धव आहेर हे शेतकरी उपस्थित होते. नांदगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात बाजरी पिकाचे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे पाहून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष योग्य पद्धतीने साजरा होत असल्याचे समाधान व्यक्त केले. उन्हाची तीव्रता वाढत असून शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर अथवा ठिबक सिंचनाचा वापर करून पीक पोटरीत असताना, फुटवे फुटण्याची अवस्थेत असताना व दाणे भरताना पाणी देण्याचे मार्गदर्शन मोहन वाघ यांनी केले. तसेच नस्तनपुर येथे व्ही एच हायस्कूल चाळीसगाव येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे बैठकीत पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्त्व श्री वाघ यांनी समजावून सांगितले आणि उपस्थित अधिकारी, शिक्षक वृंद यांना मुलांच्या आहारात ब्रेड चपाती यांच्या ऐवजी बाजरीचा घाटा ,बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, नागलीचा पापड अथवा नागलीची भाकर यांचा समावेश करण्याचे आवाहन केले. त्यावेळी श्री जगदीश पाटील तालुका कृषी अधिकारी नांदगाव राहुल जैन श्री बालाजी हिंगावार श्री रमेश कदम श्री अविनाश पुराणे श्री बाळासाहेब आव्हाड श्री अमोल थोरात ,संदीप ताजनपुरे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →