मौजे बिजघर ,ता. खेड मौजे बिजघर – उगवत वाडी, ता. खेड जि.रत्नागिरी येथे कोकण विभाग शेतकरी दूध संघ व स्टेट बँक ऑफ इंडिया खेड व कृषि विभाग यांच्या मार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

दिनांक 22/02/23 रोजी मौजे बिजघर – उगवत वाडी, ता. खेड जि.रत्नागिरी येथे कोकण विभाग शेतकरी दूध संघ व स्टेट बँक ऑफ इंडिया खेड व कृषि विभाग यांच्या मार्फत आयोजित शेतकरी मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी खेड श्री. महाडिक साहेब यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त उपस्थित शेतकर्‍यांना तृणधान्य याबाबत व त्यांचे आहारातील महत्व याबाबत माहिती तसेच कृषी विभागातील विविध योजना बाबत सविस्तर माहिती दिली. BTM श्रीम. मोहिते मॅडम यांनी PMFME योजने बाबत माहिती दिली. दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध प्रक्रिया बाबत अर्जाची माहिती दिली. यावेळी कृषी सहायक श्री. म्हस्के, कोकण विभाग शेतकरी दूध संघाचे पदाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया खेड व रत्नागिरी चे व्यवस्थापक, पशुसंवर्धन विभाग अधिकारी व मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →