आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने कृषि विभागामार्फत आयोजित मिलेट रॅली संपन्न

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कृषि विभागाच्या वतीने 23 फेब्रुवारी 2023 सकाळी 8 वाजता मिलेट दौड/रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.2023 हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आहारातील तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहीजे हा प्रमुख हेतू आहे.

पौष्टीक तृणधान्याचे महत्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभागामार्फत जनजागृती केली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून या मिलेट रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर मिलेट रॅलीला मा.श्री.अतुल कुलकर्णी जिल्हा पोलिस अधिक्षक,श्री.अभिमन्यु काशिद जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,श्री.उमेश बिराजदार उपविभागीय कृषि अधिकारी, श्री.शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषि अधिकारी,तालुका कृषि अधिकारी सर्व यांच्या उपस्थितीत  मिलेट रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात झाली. मिलेट रॅलीमध्ये कृषि विभागाचे 200 ते 250 अधिकारी  कर्मचारी 100 शालेय विदयार्थी सहभागी झाले होते. सदर रॅलीची सुरुवात मध्यवर्ती प्रशासकीय इमारती पासुन होऊन पुढे राजमाता जिजाऊ चौक,काळा मारुती चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,जिल्हाधिकारी कार्यालय शेवट मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे झाला.यावेळी रॅलीचे मध्ये  पौष्टीक तृणधान्यांचे आहारातील महत्व वाढविण्याच्या अनुषंगाने पौष्टीक तृणधान्यांच्या वेशात अधिकारी कर्मचारी होते तसेच अधिकारी,कर्मचारी शालेय विद्यार्थी यांच्या हातामध्ये पौष्टीक तृणधान्याचे महत्व विषद करणाऱ्या फलकाच्यां माध्यमातुन प्रचार प्रसिध्दीच्या घोषणा देण्यात आल्या.रॅली संपल्यानंतर उपस्थित सर्व नागरीक,शालेय विद्यार्थी अधिकारी/कर्मचारी यांना ज्वारीचा हुरडा चटणी अल्पोपाहार म्हणुन देण्यात आली.या रॅलीच्या माध्यमातुन पौष्टीक तृणधान्य जसे की, ज्वारी,बाजरी,नाचणी,राळा,भगर . धान्यांचा आहारात दैनंदिन वापर करावा असे आवाहन नागरीकांना करण्यात येत होते.

 ( अभिमन्यु काशिद )

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

          उस्मानाबाद

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →