उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, विटा जि. सांगली

आज दि.20/2 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, विटा कार्यालय मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन व पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. सर्वप्रथम विटा हायस्कूलच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांसमवेत विटा शहरातून तृणधान्य रॅली काढण्यात आली. सदरील कार्यक्रम मध्ये विविध तृणधान्य वापर करून बनवलेली उतरंड व रांगोळी आकर्षणचा केंद्रबिंदू ठरली.कृषी विभागाच्या स्टॉल च्या माध्यमातून विविध तृणधान्यचे आहारातील महत्व व पोषणमूल्ये याची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली होती.कार्यक्रमास माननीय माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, प्रांत अधिकारी संतोष भोर, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे,तहसीलदार ऋषिकेश शेळके तसेच उपविभागातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, आत्मा अंतर्गत एटीएम व बीटीएम उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →