आज दि.20/2 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, विटा कार्यालय मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन व पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे शुभ हस्ते झाले. सदरील प्रदर्शनामध्ये महिला बचत गट,महिला उद्योजक यांचे मार्फत तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मा. आमदार महोदय यांनी महिला बचत गट मार्फत तृणधान्यपासून निर्मित विविध प्रक्रिया पदार्थना बाजारपेठ मिळण्याचे दृष्टीने मोहीम स्वरूपात प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.पाककला स्पर्धेमध्ये महिला बचत गटा समवेत कृषी विभागाच्या सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवला होता.सदरील कार्यक्रम मध्ये विविध तृणधान्य वापर करून बनवलेली उतरंड व रांगोळी आकर्षणचा केंद्रबिंदू ठरली. कार्यक्रमास माननीय माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, प्रांत अधिकारी संतोष भोर, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे,तहसीलदार ऋषिकेश शेळके तसेच उपविभागातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, आत्मा अंतर्गत एटीएम व बीटीएम उपस्थित होते.