मौजे सुर पिंपरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न

मौजे सुर पिंपरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न
परभणी तालुक्यातील मौजे सूरपिंपरी येथे दिनांक 16 .2 .2023 रोजी मा.SAO विजयकुमार लोखंडे , तालुका कृषी अधिकारी श्री. नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला महिलांना तृणधान्यांमध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो व त्याचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने आहारातील महत्त्व पटवून देण्यात आले भारतीय संस्कृतीत स्वयंपाक स्त्रियाच बनवतात त्यामुळे स्त्रियांना जर तृणधान्याचे महत्त्व समजले तर कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. हल्ली मुलांच्या आहारात फास्ट फूड चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे तर त्यावर पर्याय म्हणून तृणधान्यापासून ज्वारी ,बाजरी पासून पिझ्झा बिस्कीट इत्यादी पदार्थ घरी कसे बनवता येतील याविषयी कृषी सहाय्यक स्वाती शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम प्रत्येक गावात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दैठणा मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवा कृषी पर्यवेक्षक रोशन करेवार , नदीम शेख. परिश्रम घेत आहेत.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →