आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सविस्तर मार्गदर्शन

 जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी  20/02/2023 in Stories Tagged जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी – 1 Minute

दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे. मुरुंबा तालुका जिल्हा परभणी येथे तालुका कृषी अधिकारी परभणी, श्री. नित्यानंद काळे आणि तंत्र अधिकारी डॉ. संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सविस्तर माहिती तसेच प्रचार प्रसिद्धी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ. हर्षा कौसडीकर जिल्हा सल्लागार आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, श्रीमती. स्वाती घोडके यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेतील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचे पालक व आत्मा गटातील महिला शेतकरी भरपूर संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमांमध्ये डॉ.कौसडीकर आणि घोडके यांनी मानवाच्या जीवनातील आरोग्य किती महत्त्वाचे आहे आणि पौष्टिक तृणधान्य आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे हे सर्वांना सविस्तर मार्गदर्शनातून समजावले आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचं मातृ पितृ पूजन करून आजपासून मनाशी एक ठाम निर्णय घेतला की रोजच्या आहारात तृणधान्यांचा वापर करणारच आणि आम्ही आमच्या आरोग्य सदृढ निरोगी ठेवणार हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आत्मा गटातील देवकृपा आणि लोकडोबा महिला बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले तसेच गावचे सरपंच आणि शाळेतील शिक्षक वृंद यांनीही परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →