Millets Year 2023 : भरडधान्य पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगले का असतात?

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. भरडधान्यांचे उत्पादन वाढावे तसेच त्यांचा मानवी आहारात वापर वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष पौष्टिक भरडधान्य वर्ष (Millet Year) म्हणून घोषित केलंय. भरडधान्यांचे उत्पादन वाढावे तसेच त्यांचा मानवी आहारात वापर वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे. भरडधान्यांमध्ये कर्बाबरोबरच प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ असतात. भरडधान्यांतील कर्ब पचावयास हलका असतो. ही धान्ये पौष्टिक असतात.  पूर्वी भरडधान्यांचे महत्त्व मोठे होते. आशिया खंडामधील लोकांचे हे पारंपरिक मुख्य अन्न होते. एकूण ११ महत्त्वाच्या भरडधान्यापैकी ९ भरडधान्ये भारतामधील आहेत. निरनिराळ्या प्रांतांत तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार या धान्यांना वेगवेगळी नावे आहेत. उदा. कोदो, कुटकी, ज्वारी, बाजरी, भगर, राळे, राजगिरा इ.  भरडधान्ये पौष्टिक आणि पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलांच्या आहारातही त्यांचा समावेश केलेला असतो. तसेच मोठ्या माणसांसाठी मुख्य अन्न म्हणूनही भरडधान्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ज्वारी हे ग्लुकोज आणि इतर पेयांच्या उत्पादनात वापरतात. नाचणी आणि गहू यांच्या मिश्र प्रमाणातील अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध होऊन लोकप्रिय होत आहेत. यामध्ये बिस्किटे, केक,  विविध पेये, पीठ अशा पदार्थांचा समावेश आहे. टरफल असलेले आणि टरफलाशिवाय असे भरडधान्याचे दोन प्रकार आहेत.टरफल असलेल्या भरडधान्यामध्ये राळे, वरी, सावा या भरडधान्याचा समावेश होतो तर टरफल नसलेल्या भरडधान्यामध्ये ज्वारी, बाजरीचा समावेश होतो.  ज्वारी, बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ग्रेटर मिलेट म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो, ब्राऊनटौप ही सर्व मायनर मिलेट किंवा बारीक धान्ये म्हणून ओळखली जातात. ज्वारीमध्ये साधारणतः ३५ हजारांपेक्षा जास्त वाणांची नोंद झाली आहे. राळ्याचे २९ प्रकार, नाचणीचे ३९ प्रकार, तर वरीचे १६ ते १७ प्रकार आहेत. 

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →