“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने” दिनांक – १६/२/२०२३ रोजी “Millets- Power house of Nutritian” या कार्यक्रमाचे आयोजन

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने” अन्न व औषध प्रशासन (FSSAI) व कृषि विभाग आयोजित, अश्वमेध इंजिनीअर्स व कन्सल्टटंट,नाशिक यांचे सहकार्याने दिनांक – १६/२/२०२३ रोजी Millets- Power house of Nutritian” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअनुषंगाने उपस्थित मान्यवर, अधिकारी व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त “मिलेट” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्री.उदय लोहकरे,सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग , श्रीमती.साळुंखे, फूड अॅनॅलीस्ट,नाशिक, श्री.महेंद्र छोरिया, अध्यक्ष भगर मिल असोसिएशन नाशक, श्री.जयंत गायकवाड,तंत्र अधिकारी,जि.अ.कृ.अ. कार्यालय,नाशिक व डॉ.अपर्णा फरांदे, अश्वमेध इंजिनीअर्स व कन्सल्टटंट नाशिक यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्यची ओळख, आहारातील महत्व, प्रक्रिया व मिलेट चे फायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यात केले. यावेळेस उपस्थित अधिकारी, विद्यार्थी यांना नागली हाऊस,नाशिक यांचेमार्फत नागली बिस्कीट वाटप करण्यात आले तसेच मल्टी मिलेट भगर चा आस्वाद उपस्थितांनी घेतला. यावेळी कृषि विभागा मार्फत पौष्टिक तृणधान्य पाककलापुस्तिका, मिलेट ऑफ द मंथ-ज्वारी बाजरी चे माहितीपत्रक वाटप करण्यात आले व जनजागृती करण्यात आली. तसेच पौष्टिक तृणधान्य पदार्थापासून बनवलेले पदार्थांचे दालन नागली हाऊस व फॉरमी नाशिक यांचेमार्फत उभारण्यात आले होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →