मौजे नांदिवली तालुका खेड जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन .

आज दिनांक 15/02/2023 रोजी मौजे नांदिवली तालुका खेड येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक, तृतीय क्रमांक काढण्यात आले.व विजेत्याना प्रशस्तीपत्रक,शालेय साहित्य तसेच स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या एकूण 10 स्पर्धकांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमांचे अध्यक्ष पद मा. पोलीस पाटील श्री.भार्गव चव्हाण यांनी भुषविले . मा. कृषि पर्यवेक्षक श्री येसरे साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.मा. कृषि पर्यवेक्षक नातूनगर श्री.गोठल साहेब यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून भूमिका बजावली.तर कृ.स.श्रीम.बंडगर यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर माहिती दिली.त्याचप्रमाणे मुख्याध्यापक श्री.चोरगे सर व गावचे पो.पाटील श्री.चव्हाण यांनी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास मा.सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →