महिला मेळाव्यातून पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती

आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त कृषी विभाग व WoTR संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दांडेगाव ता. भूम जिल्हा. उस्मानाबाद या ठिकाणी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात (40) महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनविले होते यामध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आले. या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अभिमन्यू काशीद यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष याबाबत आणि पौष्टीक तृणधान्यचे आहारातील महत्त्व याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच पाक कला स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना पौष्टिक तृणधान्य पासून वेगवेगळे पदार्थ बनवून त्याची योग्य मार्केटिंग करण्यासाठी PMFME योजनेतून वैयक्तिक किंवा गटामार्फत लाभ घेण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अभिमन्यू काशीद, उप विभागीय कृषि अधिकारी श्री शुक्राचार्य भोसले, WoTR संस्थेचे सर्व पदाधिकारी, कृषि सहाय्यक सुमित सोनटक्के, प्रदीप चंदनशिवे इत्यादी उपस्थित होते. सदर मेळाव्यास भूम तालुक्यातील १५० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →