राज्यस्तरीय काजू महोत्सव 2023 च्या निमित्ताने रत्नागिरीत कृषि विभागाकडून पौष्टिक तृणधान्यांची जनजागृती

काजू प्रक्रियाधारक संघ, रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने राज्यस्तरीय काजू महोत्सव 2023 चे आयोजन दिनांक 11 व 12 फेब्रुवारी 2023 रोजी दळवी कॅश्यु, जेके फाइल्स, एमआयडीसी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित साधून कृषी विभागाच्या विविध योजनांची स्टॉल मांडणी करण्यात आली होती. दोन दिवसात 1470 शेतकऱ्यांनी भेटी दिल्या व कृषी विभागाच्या योजनांचीही माहिती घेतली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे यांनी यावेळी कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकरी व प्रक्रिया धारकांना काजू मूल्यवर्धन, PMFME योजनेची व इतर योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी रत्नागिरी श्री. एन. पी. भोये, कृषी अधिकारी श्री. विद्याधर वैद्य, कृषी अधिकारी श्री. केदार, आत्माच्या BTM श्रीमती हर्षला पाटील हे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →