आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कृषी विभाग व माध्यमिक विद्यालय जुनवणे ता. धुळे यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 11.02.2022 रोजी जुनवणे गावातून विद्यार्थ्यांची पौष्टिक तृणधान्य रॅली काढण्यात आली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कृषी विभाग व माध्यमिक विद्यालय जुनवणे ता. धुळे यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 11.02.2022 रोजी जुनवणे गावातून विद्यार्थ्यांची पौष्टिक तृणधान्य रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांची रॅली संपूर्ण जुनवणे गावातून फिरून आल्यानंतर विद्यार्थ्यांना मानवी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याबाबत मंडळ कृषी अधिकारी पिंप्री श्री.प्रदीप पाटील यांनी विस्तृत माहिती दिली.पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत श्री.कैलास तेले कृषी पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालय जुनवणे चे मुख्याध्यापक श्री व्ही.बी. जोशी सर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी.टी.पाटील सर यांनी केले. तर आभार श्री. डी. व्ही. पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. चेतन गिते कृषी सहाय्यक यांनी अथक परिश्रम घेतले. आजच्या या कार्यक्रमात आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.योगेश पाटील तसेच सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.योगेश पाटील यांचा देखील सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमात जमलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, आणि वैयक्तिक शेततळे योजना इत्यादी बाबत विस्तृत माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →