आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे दहिगाव ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद

कन्नड आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशनच्या माध्यमातून मंडळ कृषी अधिकारी पिशोर ता.कन्नड कार्यक्षेत्रात मौजे दहिगाव येथे पौष्टिक तृणधान्य आहाराचे महत्त्व व जनजागृती मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.तसेच मिलेट ऑफ द मंथ या संकल्पनेने प्रत्येक महिन्यात एका तृणधान्याचे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात ज्वारी तृणधान्याचे महत्त्व विशेष असणार आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून आज मौजे दहिगाव येथे पौष्टिक तृणधान्या बाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी प्रवीण सरकलवाड यांनी गावातील उपस्थित शेतकऱ्यांना तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मिलेट ऑफ द मंथ संकल्पने अंतर्गत ज्वारी या पिकाचे आरोग्यविषयक महत्व व आहारातील वापर वाढविण्या बाबत आवाहन करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक तसेच उपस्थित शेतकऱ्यांना व शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य आहारातील वापर बाबत कृषी पर्यवेक्षक श्री दीपक बिरारे यांनी शपथ दिली. तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक श्री भूषण सोनवणे यांनी केले. प्रसंगी दहिगावचे सरपंच श्री किशोर सत्तूके, श्री महेश मनगटे व मोठ्या प्रमाणात शेतकरी, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

https://loktaksamacharnews.blogspot.com/2023/02/blog-post_72.html
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →