मौजे मुत्नाळ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न.

दिनांक – ०९/0९/२०२३ रोजी मौजे मुत्नाळ ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर कार्यालयमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम तसेच PMFME अंतर्गत अंतर्गत प्रक्रिया उद्योग जनजागृती मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये कृषी पर्यवेक्षक श्री.किरण मोर्ती यांनी मार्गदर्शन केले , सरपंच – मा.सौ. पूजा कोरी , माजी सरपंच – मा.श्री. मार्तंड जरळी , मंडळ अधिकारी – श्री. गाडीवर. ग्रामविस्तार अधिकारी श्री. डवरी , आरोग्य सेवक – श्री. माने तसेच ग्रामपंचायत सदस्य – मा.श्री. एल. टी. नवलाज, अशा वर्कर , विद्यार्थी व सर्व शेतकरी उपस्थित होते. कृषी सहाय्यक श्री. विजय खोराटे यांनी प्रास्ताविक केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →