महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) नगरपरिषद भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने संभाजी महाराज सभागृह,भडगाव येथे मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे उपस्थितीत PMFME कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत DRP प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमात PMFME योजनेअंतर्गत बँक कर्ज मंजूर पत्रांचे वाटप मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यांचे प्रदर्शन सदर कार्यक्रमात ठेवण्यात आलेले होते. सदर कार्यक्रमात रवींद्र लांडे मुख्याधिकारी नगरपरिषद,तालुका कृषी अधिकारी बी बी गोरडे, सकाळ पत्रकार सुधाकर पाटील, बीटीएम अमोल सोनवणे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते, कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांचा प्रतिसाद मिळाला.