मौजे हरतळी ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत पीक प्रात्याशिक भेट आयोजित. श्री गजानन ननावरे तालुका कृषी अधिकारी खंडाळा व श्री वैभव क्षीरसागर मंडळ कृषी अधिकारी खंडाळा यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.त्यावेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी श्री निलेश नारकर कृषी सहाय्यक, तसेच गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या उपस्थित शेतकऱ्यांना श्री निलेश नारकर कृषी सहाय्यक हरतली यांनी ज्वारीच्या हुरड्याचे आहारातील महत्त्व समजावून सांगितले व सरते शेवटी श्री निलेश नारकर कृषी सहाय्यक हरतळी यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.