मौजे चिंचनेर वंदन, धोंडेवाडी तालुका जिल्हा सातारा येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत शिवार फेरीचे तसेच हुरडा पार्टीचे आयोजन

मौजे चिंचनेर वंदन, धोंडेवाडी तालुका जिल्हा सातारा येथे माननीय तालुका कृषी अधिकारी सातारा श्री. हरिश्चंद्र धुमाळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत”.….शिवार फेरीचे तसेच हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी ज्वारी प्लॉट,तसेच मका प्लॉटची पहाणी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहायक प्रवीण नलावडे यांनी केले.मंडळ कृषी अधिकारी अंगापुर मा.श्री .सुहास यादव यांनी तृणधान्य पिकाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व यासंदर्भात अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी गावचे सरपंच मा.श्री.सुधाकर बर्गे,उपसरपंच तसेच,शिवदास कदम,सुशांत देसाई,धनाजी फडतरे,साधना देसाई, ए. आर.निकम,हेमलता फडतरे ,शैलेश गायकवाड आणि बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी शेतकरी बांधवांनी ज्वारी लागवड तसेच रोजच्या आहारात समाविष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर संयोजन प्रवीण नलावडे यांनी केले.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →